Thursday, 25 June 2020

CURRICULAE - HIDDEN CURRICULAE
Postmodern period.... HYPE-RREALISM

ज्ञान हे मानव मुक्तीसाठी वापरता येईल किंवा ज्ञानाचा उपयोग हा समस्त मानव जातीच्या भल्यासाठी करता येईल... यावरचा उडालेला विश्वास..., असा हा कालखंड . सारं काही अतिवास्तव ... सगळी आकडेवारी चांगली असते... सगळे फीडबॅकस पॉसिटीव्ह...... समोरचं सगळं (तसं नसतानाही ) छान छानच कसं असू शकतं ?  ... आणि माझ्या समोर बसलेल्या पिढीसाठी सांस्कृतिक प्रतीकच महत्वाची कशी असू शकतात.... "मेसेजेस फॉरवर्ड " होत राहतात... मेसेज कुणी पाठवलाय... तो पाठवणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी काय... माहित नसतं पण सर्क्युलेशन चालूच राहतं . यामागचा अर्थकारण आणि राजकीय वास्तव दिसतच नाही... कारण आपण अतिवास्तव बघत राहातो. आपला फोकस आपल्याला चुकवायच नसतो. 
नवीन शैक्षणिक धोरण म्हणतंय कौशल्याधिष्ठित शिक्षण गरजेचे आहे.... इथे तर 'कौशल्याधिष्ठित शिक्षण' म्हणावे की 'कौशल्याधिष्ठित ज्ञान' म्हणावे इथून सुरुवात आहे. SKILL=KNOWLEDGE हे एक चुकीचं समीकरण आपल्यासमोर मांडलं जातंय. शिक्षणाला बाजारकेंद्री बनवलं जातंय. पूर्वी म्हणायचे ... "शिकून सावरून मोठा हो. " त्यामागचा मतितार्थ काय होता? शिकून सावरून मोठा झालेला माणूस माझ्यासाठी तरी ज्याला WHAT IS FAIR AND WHAT IS UNFAIR हे कळतं तो. शिक्षण आपल्याला एक दृष्टी देतं . सौदर्य  कशाला म्हणायचं, काय बटबटीत आहे आणि काय विरूप आहे... याची जाण देतं, मानवता आणि क्रौर्य यातला फरक दाखवतं. पण आजच्या शिक्षणामध्ये या तिन्ही गोष्टींशिवायचं शिक्षणच दिलं जातंय. Morality, fairness, beauty... याची वानवाच आहे इथे...  
(हिंसा ही केवळ शारिरीक  वा मानसिक नसते... ती प्रतीकात्मक ही असते... एखादी गोष्ट फालतूच ( हा शब्द वापरायचा नव्हता पण तोच कळतो आजकाल) आहे असे शंभर वेळा म्हंटल्यावर ती समोरच्याला फालतू च वाटू लागते....ती नसली तरीही... हेच काम आज सोशल मीडिया करत आहे. असा कितीतरी चांगल्या  गोष्टींची  symbolic violence गेली कित्येक वर्ष झाली आहे. )

नेहमी विचार येतो मनात... ही तंत्रज्ञान चालवणारी डोकी...नक्की कोणत्या प्रकारचं जग निर्माण करतील. अशा प्रकारे निर्माण झालेली माणसं  नक्की कोणाच्या हाताखाली काम करतील... विज्ञान , तंत्रज्ञान, व्यापार याना  उद्देशून हे मुळीच लिहिलेलं नाही... ती गरज आहे आपली... पण मानवता, करुणा यांचा अभाव असलेली एक पिढी तयार झालीय. beauty, fairness, morality याविषयीची उदासीनता... आणि याविषयी असलेच तर ते किती चुकीचे समज मनात बाळगून आहोत आपण याची जाणीव सतत होत राहते. 
आणि हो.. एकीकडे शिक्षणामध्ये नवनवीन टूल्स आणि मेथड्स येत राहतात... बदलतात...नवीन शैक्षणिक धोरणामुळे एक पिढी तंत्रज्ञान आणि इंटरनेट च्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करतेय. (या प्रगतीची परिभाषा ही वेगळीच... अधिकाधिक भौतिक साधनांचा वापर करून आपलं  स्वतःचं  आयुष्य सुकर करणे म्हणजे प्रगती... ) अशी एक पिठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असते अन एक पिढी शिक्षणाच्या परिघातून बाहेर पडलेली... सुविधांचा अभाव असलेली... ती कशी मोठी होतेय? ...ते आपल्याला माहित नाही... ती पिढी त्यांच्या परीने घडत जाते...मग पिढ्यानपिढ्या  व्यवस्थेचा एक भाग होण्याचा प्रयत्न करूनही उपेक्षित राहिलेली ही पिढी कशी असेल? उत्तर शोधायची नाहीय... वास्तव समोर आहे... रोज ब्रेकिंग न्यूज बनून डोळ्यासमोर नाचत आहे ते आपल्या. पण आपल्या डोळ्यासमोर एक पडदा आहे... आपण अतिवास्तव पाहत राहतो...आणि शेजारी हत्याकांड होऊनही good morning चे मेसेजेस फॉरवर्ड करत राहतो. 

(शिक्षणाने समाज घडतो यावर माझा ठाम विश्वास आहे... आणि शिक्षकाला सामाजिक भान असणे आणि त्याच्या विचारांना  नैतिकतेची बैठक असणे आवश्यकच आहे. काहीतरी विचित्र बोलल्यासारख वाटतंय नं ... कारण खूप दुर्मिळ झालाय हे सारं ...   )

मी नाहीय कुठे हेच खरं ... 

Monday, 23 July 2018

त्र्याऐंशी गुलाबफुलांचं तुझं गणित
कधी समजलंच नाही मला.

आम्ही  मोजत रहायचो
दररोज द्विगुणित होत जाणाऱ्या कळ्यांची संख्या
आणि उमलण्यासाठी उरलेले दिवस....
तू हसून म्हणायचीस,
"नसतात मोजायचे असे दिवस...
खूप जड जाते मग नेहमीची अवस "

हळू ... हळू.. थोडं सावकाश असं म्हणता म्हणता
एके दिवशी भरगच्च बहरुन उभं राहिलं तुझं झाड
जणू काट्याकाट्यालाही आली होती उर्मी
फूल बनून बहरण्याची

लोक म्हणायचे, "बाईच्या दारी मरणपीक आलंय "

आठवत नाही खरं तेव्हा कुणी गेल्याचं

पण त्र्याऐंशी गुलाबफुलांचं ताट
जेव्हा ओसंडून वाहिलं होतं पडवीत
तेव्हा घटा घटा  पाणी प्यायलीस
तांब्याभर...
आता उभं तुझंच झाड... उरलेल्या काट्यांसकट
मूकपणे छाटून टाकलेस
निरर्थक मागे उरलेल्या देठांचे सरळसोट स्तंभ
कारण ठाऊक होतं त्या झाडासारखंच तुलाही,
आता फक्त न उमलणाऱ्या कळ्यांचेच
चढतील साज... येत्या काही वर्षात

तुझी गुलाबाची त्र्याऐंशी फुलं
आणि माझ्या तळहातावरील एक वर्ष ओलं
जेव्हा उडून गेले घालून हातात हात
तेव्हा उघडा पडलेला तुझ्या डोळ्यांचा कोरडा तळ
आणि माझ्या तळहातावरील भळभळतं दव
सारं काही आठवतं,

पण खरंच नाही आठवत...
त्यावर्षी कुणी गेल्याचं ...!


Monday, 2 July 2018

Jean : I have something to tell you Mrs Gottlieb
Mrs Gottlieb: well then don't stand on ceremony dear.
Jean : Gordon's gone up the pipeline to spend eternity on your planet since it seems you loved him most.
Mrs. Gottlieb : what?
Jean : Its hard to explain. you won't understand untill you die.
Mrs Gottlieb : Is he waiting for me there? in heaven ?

climax of the plaay, "a daed man's cellphone" by sarah  ruhl ... dismissed the idea of translating this play for a friend.
हे वाचल्यानंतर पोट  धरून हसले . पाइपलाईन मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहणारा आत्मा... तिथेच आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मुक्ती प्राप्त होऊन आनंदाने जगेल (?) एवढं फुटकळ पुन्हा कधी वाचू असं वाटलं नव्हतं . दिल्लीतील बातमीने आपला मेंदू विचार करणं बंद करणार कि काय ? नेमकं कोणत्या माणसांमध्ये वावरतोय आपण? आणि नेमका आपल्याला धक्का कशाचा बसलाय हे असे प्रश्न पडलेले असताना पुन्हा एकदा पाईपलाईन आणि आत्मा यासंदर्भातली एक कविता वाचायला मिळाली. स्वतःला असलेले मानसिक आजार कुरवाळत जगणाऱ्या माणसांच्या भयानक गर्दीतून वाट काढत जगतोय का आपण? या पडलेल्या प्रश्नाला अत्यंत समर्पक असे हे उत्तर या कवितेत सापडले. परखड अशा पण आजूबाजूच्या परिस्थितीने उद्विग्न झालेल्या... या कवितेने आत्म्याने बदललेल्या मार्गाचा कर्कश्य आवाज अचूक टिपलाय .  

आत्मा अमर आहे पण
कळत नाही आईच्या नाकातून
पोरांच्या गर्भात कसा आत्मा शिरलाय
मी कशाला विचार करू, माझा पाइप मी निवडलाय
कारण आत्मा जायचा मार्ग आता फक्त पाईपातून उरलाय
नऊ महिने छळ करून त्याने टाहो फोडलाय
नैन दहती पावक: वाक्याचा अर्थच आता संपलाय
देवाला भेटायचा मार्गही आता भिंतीत खणलाय
कारण आत्मा जायचा मार्ग आता फक्त पाईपातून उरलाय
उगाच छपरावर वाडी ठेवून कावळ्याची वाट बघत बसताय
आत्मा भटकत बिटकत नाही तो थेट वाटेला लागलाय
माझा ऐका, कुठे पुष्पक आणि संजीवनच्या नादाला लागताय
कारण आत्मा जायचा मार्ग आता फक्त पाईपातून उरलाय
आठवतय ना तुम्हाला तो खांब फोडून भेटलाय
जबड्यात विश्वरूप दाखवणारा आता फक्त भोकात मावलाय
तुमचं तुम्ही बघा, माझा मी प्लंम्बर शोधलाय
कारण आत्मा जायचा मार्ग आता फक्त पाईपातून उरलाय
- ऋषी श्रीकांत देसाई

Tuesday, 12 June 2018

मी तुझ्या काही सरी या 
बंधूनी घेते उशाला 
घनघोरही आश्वस्त आहे 
या तमाचे भय कशाला 

ते उभे आकाश आहे 
मातीत उगवून माखलेले 
चातकाचे एक गाणे 
अस्वस्थसे ओघळलेले 

व्यर्थ काटे तोडीते ती 
काट्याविना हे रान नाही 
काय सांगू बाभळीला 
तुज अंगणाचे दान नाही ?

स्वप्नातले रेखाटले मी 
चित्र हे जागेपणी 
हरेक रेघ बोलते की 
मौन बाळगते कुणी? 

पाय हे अंधारलेले 
अन स्मृतींचे ऊन झाले 
कोरड्या डोळ्यात माझ्या 
गाव ओले ... निजलेले 

Sunday, 25 March 2018

नैतिक मूल्यविचाराच्या क्षेत्रात धर्माची मक्तेदारी एवढी प्रबळ आहे, की जीवनविषयक विवेकनिष्ठा आणि नैतिकतेचा भावार्थ इतर दृष्टिकोनातून स्पष्ट करणे महाकठीण कर्म होऊन बसले आहे. नीतिशास्त्रावर कब्जा करून धर्माने नैतिकता जणू माणसाच्या विरुद्ध असलेल्या अस्त्रासारखी वापरली त्याचप्रमाणे भाषेतल्या सर्वोच्च नैतिक संकल्पनाही पार्थिवाच्या पलीकडे, माणसाच्या पोहोचेपलीकडे नेऊन ठेवल्या. 'उत्कट अनुभव ' येण्याची भावस्थिती हि केवळ पारलौकिक तत्वाचे ध्यान करतानाच प्राप्त होते, असेच गृहीत धरले जाऊ लागले. 'पूजा' याचा अर्थ  केवळ माणसापेक्षा कुणातरी वरच्या शक्तीला श्रद्धेने निष्ठा वाहणे असाच घेतला जाऊ लागला. 'श्रद्धा' म्हणजे केवळ गुढगे टेकून, माथा लववून कुठल्याशा पवित्र समजल्या जाणाऱ्या गोष्टीचा आदर करणे असे ठरवूनच गेले. जे जे काही मानवाच्या ऐहिक जीवनाचा स्पर्श नसलेले असते तेच 'पवित्रः' असे सर्वानी मान्य करून टाकले.
पण या संकल्पना अखेर खरोखराच्याच भावनांना शब्द देणाऱ्या संकल्पना आहेत.... पारलौकिक असे काहीही अस्तित्वात नसतानाही त्या खऱ्याच असतात. या भावना अनुभवताना खरोखरच उदात्त उत्कट वाटते. धर्मश्रध्दांना अपेक्षित असल्यानुसार स्वतःला क्षुद्र लेखले नाही तरीही हे अनुभव येऊ शकतात. मग या भावनांचा उद्गम किंवा संदर्भ वास्तवात कुठे होत असतो? आदर्श नैतिक मूल्यांशी निष्ठा वाहताना येणारा हा भावनिक अनुभव माणसाला येतोच. आणि तरीही केवळ धार्मिक अनुभवांव्यतिरिक्त या भावानुभवांना काहीच ओळख नाही, परिभाषा नाही, शब्दच नाहीत. 
गूढवादाच्या धुराळ्यातून मानवी भावानुभवांच्या या सर्वोच्च पातळीला बाहेर काढणे गरजेचे आहे. त्या अनुभवांचा संबंध केवळ एकाच गोष्टीशी आहे हे सांगितले गेले पाहिजे - तो संबंध आहे मनुष्यत्वाशी. याच अर्थाने, याच भावार्थाने आणि उद्देशाने, याच जीवनहेतूने मी 'फाउंटनहेड' मधील मनुष्यपूजेचे नाट्य उभे केले आहे.
ही भावना फार कमी, फार मोजक्या लोकांना अनुभवता येते. मानवी जीवनातील उदात्तता काहींना अगदी क्षणकाळ पेटून विझलेल्या ठिणगीसारखी जाणवते... त्यातून काहीच परिणाम सध्या होत नाही. काहींना मी कशाबद्दल बोलतेय तेच कळणार नाही. काहीजण केवळ ठिणग्या विझवण्याचेच कार्य अंगीकृत असल्यासारखे , धर्मोपदेशातील निस्वार्थ सेवावड, वावरतात.
मनुष्य-पूजा म्हणजे नेमके काय, याबद्दल वैचारिक गोंधळ नको. धर्माच्या पकडीतून नैतिकता सोडवून तिला निधर्मी निधर्मी स्वरूप देण्याच्या नावाखाली अतिशय अविचारी, अविवेकी स्वरूप देण्याचे अतिशय गर्हणीय काम होते आहे. उदाहरणार्थ, आधुनिक समूहवादाचे विविध प्रकार (साम्यवाद, फॅसिसम आणि नाझीवाद वगैरे. ) , धर्मोपदेशातील निःस्वार्थ सेवावाद जसाच्या तास ठेवतात आणि केवळ देवाच्या  ऐवजी समाजाची पूजा करायला शिकवतात. आधुनिक तत्वज्ञानातील अनेक पंथ असे आहेत, जे वास्तवाची ओळख विसरून वास्तव म्हणजे सातत्याने बदलणारा प्रवाह आहे असे प्रतिपादन करतात. यात ते चमत्कारांनाही स्थान देतात आणि माणसाच्या किंवा समाजाच्या लहरींनाही स्थान देतात. हे नवं-गूढवादाचे अनुयायी मनुष्यपूजा नव्हे तर मनुष्यजीवनाचा अतिशय वाईट पद्धतीने अधिक्षेप करतात. त्यांच्या धर्मवादी पूर्वसूरींपेक्षा अधिक कडवा अधिक्षेप.
मानवी अस्तित्वाचा अधिक्षेप करण्याची सर्वात वाईट पद्धत म्हणजे आजकालच्या आपल्या (काँक्रीट-बाउंड) मूल्यविचार न करता केवळ समोर जे दिसते त्याचा विचार करणाऱ्या, सांख्यिकीविचार करणाऱ्या बुद्धिवाद्यांची. मानवी प्रेरणांची ताकद ओळखण्याची क्षमताच  नसल्यामुळे ते घोषित करून टाकतात की, मनुष्य हा पूजेयोग्य असूच शकत नाही, कारण - असली उदाहरणं आम्हाला तरी कुठे दिसली नाहीत बुवा!
मी म्हणते आहे त्या अर्थाने ज्यांना माणसातील अत्युच्च क्षमतेचे भान असते तेच केवळ मनुष्यपूजक असू शकतात, आणि ती पूजा प्रत्यक्षात उतरावी म्हणून ते प्रयत्न करीत राहतात. मनुष्य-द्वेष्टे  असतात ते, जे माणसाला असहाय्य, नीतिभ्रष्ट आणि तुच्छ पशुसं मानतात आणि माणूस या वर्णनातून कधी बाहेर पडणारच नाही अशीच काळजी घेत राहतात. माणसाला मानवजातीबद्दल जे ज्ञान होते ते स्वतःच्या माध्यमातून प्रथम होते हे इथे लक्षात ठेवायला हवे.
या दोन ध्रुवांमधील सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की एका प्रकारच्या विचारसरणीत मानवाच्या आत्मगौरवाची उत्कट अनुभूती आणि त्याच्या पृथ्वीतलावरील आनंदासीद्धीचे पावित्र्य यासाठी परमनिष्ठा वाटते. आणि दुसऱ्या बाजूला या दोन्ही गोष्टी अशक्य व्हाव्यात या दृष्टीने काम करण्यासाठी परमनिष्ठ असते. बहुसंख्य मानवजात आपली सर्व मानसिक शक्ती आणि जीवन या दोन ध्रुवांमध्ये लोम्बकळत घालवते. नेमका प्रश्न आपल्याला कधी समजूच नये यासाठी जीव पाखडते.

आयन रँड
फाउंटनहेड या कादंबरीच्या पंचविसाव्या वर्षाच्या विशेष आवृत्तीसाठी लेखिकेची प्रस्तावना

Saturday, 24 March 2018

मी जी उदात्तता एक छद्म आभास म्हणून रंगवतो ती मला प्रत्यक्षात पाहायची आहे. सत्यात उतरलेली, माझया जिवंतपणी , माझ्या जगण्यात. ती आकांक्षा असलेलं आणखीही कुणीतरी, कुठेतरी अस्तित्वात आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. नाहीतर मग ते स्वप्न पाहण्यात , आणि काहीतरी अशक्य असं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतःला जाळत राहण्यात काय अर्थ आहे ? आत्म्यालासुद्धा इंधन लागतं. ... नाहीतर आत्माही कोरडाठाक पडून मृत होऊ शकतो.

आयन रँड 

Tuesday, 2 January 2018

न्योछावर  प्रेम ये , जीवन ये उन आँखों के पानी पर
किसी शबरी के जूठे  बेर वाली इक कहानी पर
न्योछावर उस कनु पर , वो कनु जो ईश है मेरा
कनु के प्रेम मैं पागल किसी मीरा दीवानी पर


आपने वो शबरी और राम की कहानी सुनी है न ? और कनु मेरे लिए प्रेम का प्रतीक है...  कनु कभी कृष्ण है ,, कभी राधा है ,,, कभी मीरा है... कभी ये तीनो ,, और कभी कुछ नहीं,,, कभी सिर्फ एक अधूरापन,, एक प्यास,,, और कभी कनु उस प्यास की तृप्ति है.....