CURRICULAE - HIDDEN CURRICULAE
Postmodern period.... HYPE-RREALISM
ज्ञान हे मानव मुक्तीसाठी वापरता येईल किंवा ज्ञानाचा उपयोग हा समस्त मानव जातीच्या भल्यासाठी करता येईल... यावरचा उडालेला विश्वास..., असा हा कालखंड . सारं काही अतिवास्तव ... सगळी आकडेवारी चांगली असते... सगळे फीडबॅकस पॉसिटीव्ह...... समोरचं सगळं (तसं नसतानाही ) छान छानच कसं असू शकतं ? ... आणि माझ्या समोर बसलेल्या पिढीसाठी सांस्कृतिक प्रतीकच महत्वाची कशी असू शकतात.... "मेसेजेस फॉरवर्ड " होत राहतात... मेसेज कुणी पाठवलाय... तो पाठवणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी काय... माहित नसतं पण सर्क्युलेशन चालूच राहतं . यामागचा अर्थकारण आणि राजकीय वास्तव दिसतच नाही... कारण आपण अतिवास्तव बघत राहातो. आपला फोकस आपल्याला चुकवायच नसतो.
नवीन शैक्षणिक धोरण म्हणतंय कौशल्याधिष्ठित शिक्षण गरजेचे आहे.... इथे तर 'कौशल्याधिष्ठित शिक्षण' म्हणावे की 'कौशल्याधिष्ठित ज्ञान' म्हणावे इथून सुरुवात आहे. SKILL=KNOWLEDGE हे एक चुकीचं समीकरण आपल्यासमोर मांडलं जातंय. शिक्षणाला बाजारकेंद्री बनवलं जातंय. पूर्वी म्हणायचे ... "शिकून सावरून मोठा हो. " त्यामागचा मतितार्थ काय होता? शिकून सावरून मोठा झालेला माणूस माझ्यासाठी तरी ज्याला WHAT IS FAIR AND WHAT IS UNFAIR हे कळतं तो. शिक्षण आपल्याला एक दृष्टी देतं . सौदर्य कशाला म्हणायचं, काय बटबटीत आहे आणि काय विरूप आहे... याची जाण देतं, मानवता आणि क्रौर्य यातला फरक दाखवतं. पण आजच्या शिक्षणामध्ये या तिन्ही गोष्टींशिवायचं शिक्षणच दिलं जातंय. Morality, fairness, beauty... याची वानवाच आहे इथे...
(हिंसा ही केवळ शारिरीक वा मानसिक नसते... ती प्रतीकात्मक ही असते... एखादी गोष्ट फालतूच ( हा शब्द वापरायचा नव्हता पण तोच कळतो आजकाल) आहे असे शंभर वेळा म्हंटल्यावर ती समोरच्याला फालतू च वाटू लागते....ती नसली तरीही... हेच काम आज सोशल मीडिया करत आहे. असा कितीतरी चांगल्या गोष्टींची symbolic violence गेली कित्येक वर्ष झाली आहे. )
नेहमी विचार येतो मनात... ही तंत्रज्ञान चालवणारी डोकी...नक्की कोणत्या प्रकारचं जग निर्माण करतील. अशा प्रकारे निर्माण झालेली माणसं नक्की कोणाच्या हाताखाली काम करतील... विज्ञान , तंत्रज्ञान, व्यापार याना उद्देशून हे मुळीच लिहिलेलं नाही... ती गरज आहे आपली... पण मानवता, करुणा यांचा अभाव असलेली एक पिढी तयार झालीय. beauty, fairness, morality याविषयीची उदासीनता... आणि याविषयी असलेच तर ते किती चुकीचे समज मनात बाळगून आहोत आपण याची जाणीव सतत होत राहते.
आणि हो.. एकीकडे शिक्षणामध्ये नवनवीन टूल्स आणि मेथड्स येत राहतात... बदलतात...नवीन शैक्षणिक धोरणामुळे एक पिढी तंत्रज्ञान आणि इंटरनेट च्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करतेय. (या प्रगतीची परिभाषा ही वेगळीच... अधिकाधिक भौतिक साधनांचा वापर करून आपलं स्वतःचं आयुष्य सुकर करणे म्हणजे प्रगती... ) अशी एक पिठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असते अन एक पिढी शिक्षणाच्या परिघातून बाहेर पडलेली... सुविधांचा अभाव असलेली... ती कशी मोठी होतेय? ...ते आपल्याला माहित नाही... ती पिढी त्यांच्या परीने घडत जाते...मग पिढ्यानपिढ्या व्यवस्थेचा एक भाग होण्याचा प्रयत्न करूनही उपेक्षित राहिलेली ही पिढी कशी असेल? उत्तर शोधायची नाहीय... वास्तव समोर आहे... रोज ब्रेकिंग न्यूज बनून डोळ्यासमोर नाचत आहे ते आपल्या. पण आपल्या डोळ्यासमोर एक पडदा आहे... आपण अतिवास्तव पाहत राहतो...आणि शेजारी हत्याकांड होऊनही good morning चे मेसेजेस फॉरवर्ड करत राहतो.
(शिक्षणाने समाज घडतो यावर माझा ठाम विश्वास आहे... आणि शिक्षकाला सामाजिक भान असणे आणि त्याच्या विचारांना नैतिकतेची बैठक असणे आवश्यकच आहे. काहीतरी विचित्र बोलल्यासारख वाटतंय नं ... कारण खूप दुर्मिळ झालाय हे सारं ... )
मी नाहीय कुठे हेच खरं ...
No comments:
Post a Comment