Saturday, 5 September 2015


खरं …
आज मला तुझी खूप आठवण येतेय…
तू उभी असतेस दारात
अंगणातून बाहेर जाणाऱ्या वाटेकडे डोळे लावून

तू आवडीने लावलेले गुलाबाचे ताटवे
तटतटुन फुलून
साजरे करायचे तुझ्या अस्ति त्वाचे  सण
त्यांची मुळे हळुवार मोकळी करताना
तुझ्या मनातला गुंता सुटलेला जाणवायचा
मग स्वतः शीच काहीतरी ठरवल्यासारखं …
तुडुंब भरून वाहायच्या झाडांच्या ओळी

उन्हात वाळलेली झाडं
तुझी तगमग व्हायची
त्यांच्या मुळांची तहान
तुझ्या डोळ्यात तरळायची

बरसायचीस भरभरून
पानं , फुलं , फांदी , माती
अन पक्षीही. . .
सारे तुझे तुझेच व्हायचे

पण अताशा ऊन वाढतच चाललंय
अन तू ही हरवून गेलीयस स्वतःमध्ये
आता तुझे डोळे म्हणजे… 
शांत प्रवाहात आत आत
स्वतःत ओढले गेलेले भोवरे

त्यांची ओढ आता सोसवत नाही .
खर….
आजकाल मी माझ्या डोळ्यात पाहत नाही



No comments:

Post a Comment