तुकडा तुकडा
आभाळ कोसळे
नदीला न कळे
वळण वेगळे
पुराच्या पाठीशी
चांदणे विरक्त
अंगणी बोलका
बहर प्राजक्त
मन हे गोंदले
रीतीने नांदले
होऊनी सुवास
फुलात सांडले
उनाडशी सर
तहानले घर
मातीच्या ओंजळी
ओसरला पूर
काजळाचा डोह
विजेला पाझर
पालथी वाहती
काळोखी घागर
No comments:
Post a Comment