Wednesday, 6 August 2014

हेगेलचा आध्यात्मिक विरोधविकासवाद 

- "विचार हेच खरे मूलभूत असून वस्तू जशा आहेत तशा त्या असण्याचे कारण म्हणजे त्यात गर्भित असणाऱ्या आणि प्रकट होणाऱ्या कल्पना किंवा विचार होय . " 
- "जे काही प्रत्यक्षात आहे ते ज्या प्रमाणात सत्य आहे त्या प्रमाणात ती कल्पना आहे . आणि तिचे सत्यत्व केवळ कल्पनेत आणि कल्पनेमुळेच आहे . "
- "परस्पर विरोधी विचारांच्या प्रक्रियेतून नवीन अधिक विकसित विचारतत्व उदयास येते .  "

Friday, 30 May 2014

अ. भा. भि.

5 August 2012 at 00:41
धो धो कोसळणारा पाऊस . . चिखल आणि चिकट माणसं यातून सावरत स्टेशन गाठावं . . .आणि न चुकता दिसतात ते भारतीय अर्थसंकल्पाच्या फसलेल्या अहवालाचे विराट दर्शन घडवणारे भिकारी . एखादी बाई आणि पाठीवर मूल , हात किंवा पाय तुटलेला मुलगा , बुब्बुळ हरवलेल्या खोबण्या घेऊन फिरणाऱ्‍या भिकाऱ्‍यांच्या जोड्या . का कुणास ठाऊक लहानपणापासून भिकारी ही मला शिवीच वाटत आलीय . आणि आजही "तो भिकारी" असे बोलताना जीभ अडखळते आणि "तो माणूस" हेच शब्द तोँडावाटे बाहेर पडतात .

ट्रेनची वाट बघत उभं रहावं आणि लक्ष जावं एखाद्या भिकाऱ्‍याच्या मुलीकडे . खूप गोंडस हसणारी (हसू शकतात ती गोँडस) , डोळ्यात बालमनाची चमक , अगदी सहज लक्ष वेधून घेणारी ती . लाडात येऊन हलकेच आपल्या तेवढ्याच काळवंडलेल्या आणि सुकून गेलेल्या आईचा पापा घेऊन डोळे मिचकावत बघते तिच्याकडे . अन आपल्याही चेहऱ्‍यावर आपल्या नकळत कौतुकमिश्रित हसु उमलतं (चूक करतो का आपण ?). आणि अगदी पुढच्या क्षणाला आई तिला हळूच काहीतरी सांगते आणि तेच मूल हात पसरत आपल्यासमोर उभं राहातं . डोळ्यातली तीच चमक शोधत आपण स्तब्ध . मातृत्वाची अशी कोणती अगतिकता असावी की आपल्या पोटच्या गोळ्याला असं दीनवाणं करत फरफटत नेते ती ? (ती बाई त्या मुलीची आई नसेलही , पण एखाद्या लहान मुलाचं आपल्याशी आईसारखं वागणं हेच मातृत्व प्रदान करायला पुरेसं असावं) रेल्वे स्टेशनवर वाढलेली पोसलेली , ट्रेनच्या गतीशी स्पर्धा करायला सरावलेलं त्यांचं शरीर . . .पण धाव मात्र फक्त भीक मागण्यापुरती . . .

नवीन वर्ष , पहिला दिवस , सरावाने आपली झालेली खुर्ची आणि टेबल गाठावं , मनातल्या मनात कामाची आखणी आणि आपल्याच तंद्रीत असताना अतिशय दबलेल्या आवाजात कुणीतरी विचारावं "मॅडम चहा ?" पंधरा- सोळा वर्षाँचा मुलगा . दारिद्र्याच्या सर्व खुणा अंगावर बाळगणारा . आणि त्या खूणा अधिकच ठसठशीत दिसाव्यात म्हणून की काय कॅँटीन काँट्रॅक्टर ने दिलेला तितकाच मळकट युनिफॉर्म . दबलेला प्रश्न आणि आपण म्हणावं "दे चहा" . मग हा होऊन गेलेला नित्यनियम . हो - ना एवढा संवाद . पण डोळ्यात सच्चेपणा . सर्व उच्चभ्रू सधन लोकांच्या त्या गर्दीत परिस्थितीच रडगाणं न गाणारा तो एकमेव . कोणतंही काम करण्याची तयारी . चहा देताना फक्त कपच नाही तर नजरही आदराने ओतप्रोत भरलेली . वर्षाअखेरीस आपल्याला वाटतं प्रामाणिक आहे मुलगा शिकला पाहिजे .

नवीन वर्ष , पहिला दिवस . सही करण्यासठी ऑफिसमध्ये जावे , तर हसतमुखाने पेन समोर धरणारा . "मॅडम मला काम मिळालय इथे शिपायाचं कार्यालयात." "अरे वा !" आनंद चेहऱ्‍यावरुन ओसंडून वाहणारा . हळूहळू कामाची सवय झालेली . एखाद दिवशी आपण जेवणाचा डब्बा विसळण्यासाठी उठावे तर लगबगीने त्याने म्हणावे "मी देतो घासून " आणि आपण म्हणावे , "ज्या कामासाठी नेमणूक झालीय ते कर असं केलस तर काही दिवसांनी तुला सर्वाँचीच कामं करावी लागतील ." फार काही कळलं नसावं त्याला पण कुणाची वैयक्तिक कामं करू नयेत एवढं कळलं असावं . म्हणून त्याने एखाद्या व्यक्तीचे काम करण्यास नकार द्यावा आणी दुसऱ्‍या दिवशी हिरमुसल्या चेहऱ्‍याने काम करताना दिसावा . मग कळतं आपल्याला "काम करण्याचा नकार - केबिनमध्ये गेलेली तक्रार - अन झालेली कान उघडणी"

आता तो सतत दिसतो चहाचे कप विसळताना , पाण्याचे ग्लास भरुन देताना . आपण हट्टाने त्याला म्हणावं "तू हे करु नयेस असं वाटतं मला . सरळ नकार न देता या वेळेत ईथे येणं टाळु शकतोस ना तू ." आणि पुढून पटकन प्रश्न यावा "आपण सगळे फक्त लाचारच नाही तर भिकारीही असतो . जगणं खूप कठीण आहे मॅडम" अनुभवाचे कोणते टप्पे पार केल्यावर तो असं बोलला माहीत नाही . पण "मॅडम चहा ?" असा हसून प्रश्न विचारणारे नितळ डोळे शोधत आपण स्तब्ध .

भिकाऱ्‍यांना आत्मसन्मान नसतोच मुळी म्हणून पहिलं मूल आपल्याला एकदाच हेलावून टाकतं . पण कष्टाने घेतलेलं शिक्षण निश्चितच आत्मसन्मानाची भावना रुजवतं . (बाळा आता कॉलेजमध्ये शिकतोय .) पण सन्मानानं जगण्याच्या धडपडीत आत्मा किती उरतो हे फक्त पहायचं . कारण आपल्या जगण्याच्या सर्व तत्वांचा आपल्या डोळ्यांदेखत सहज पराभ करीत "बाळकृष्ण" जगत असतो . हे क्षणभराचं हेलावणं नाही आत्म्याचं कण कण जळणं आहे .

My Favourite Story

31 July 2012 at 18:32
DUSTY DISTANCE

One of the stories the Blue Donkey tells- there is a controversy about whether to classify it as a fact or a fiction-is about the first time she set off on a long dusty road to make her fortune. In no time at all, she met a woman who offered her a carrot, a place to stay and an occupation. 'no thank u ' replied the Blue Donkey. 'you see i am a poet, and i have a long way to go.' 'wht is a poet?' enquired the woman. This so disconcerted the Blue Donkey that she muttered and mumbled and managed to utter a hasty good bye and marched onwards. In consequence she nearly ran down a fellow wayfarer.

The Blue Donkey apologised profusely, and to show that she was genuinely sorry and genuinely interested she asked him who he was and what he was doing and what was his purpose. 'oh' he answered sternly, 'i am on my way to encounter Life. When i find her, i shall take her by the throat and grapple with her'. 'And then?' asked the Blue Donkey, enthralled by this account in spite of herself. 'And them i shall bind her hand and foot and take her home.' 'And then?' The Blue Donkey was almost whispering now. 'And then,' he responded magnificently, 'i shall chop her up and grind her down and put her into delicate mince pies which shall go on the market at fourspence a dozen.' His teeth were gleaming. He turned on her. ' And who r u?' he enquired suddenly. ' Oh, I am only a poet,' the Blue Donkey murmured with what she considered suitable modesty. But her fellow traveller grew highly indignant. ' Rubbish' he cried. 'I am a poet. Why u? U r only a bit of Life ' As he said this, his eyes grew round with speculation. The Blue Donkey didnt wait for more. She says that her readers can all her coward if they like, bt she galloped off fast and left him behind in the dusty distance.

Eventually the countryside grew greener. There were landscaped gardens, immaculate woods, and in one of these woods there was a Beautiful Lady reclining gracefully against a convenient trunk. She was reading a book. As the Blue Donkey approached, the Lady looked up and smiled at her. 'Hello' said the Blue Donkey. 'what are you reading?' 'Poetry,' sighed d Lady. 'I think poetry is so beautiful. I feel i could live on poetry and fresh air forever.! The Blue Donkey edged closer. She said, ' Well, as it happens, i am a poet. Perhaps you would like me to recite some of my verse.' 'Oh. Oh no' the Lady replied hastily, then she recovered herself. ' The fact is, ' she explained, ' Though i have studied many languages and my French and German are both excellent, i have never mastered Blue Donkese. And though i have no doubt whatsoever that your poems are excellent, i fear they would fall on untutored ears. ' ' But please, i speak English. ' The Blue Donkey could hear herself sounding plaintive. ' Oh ' murmured the Lady. ' But surely as a Blue Donkey, integrity requires that you paint the world as it appears to you. And consider: what have a lady and a donkey in commen? '

' Nothing at all, ' said the Blue Donkey sadly and she turned away and traced her steps. At last she came to the door of the woman she had first encountered. "Please, " she enquired humbly, "Would you settle for a part-time worker for half a carrot? "

. . .SUNITEE NAMJOSHI

वणवा

14 May 2012 at 14:56

ऊभा अंगणी बकुळ
त्याची गंधित सावली
त्यांच्या मनाची फुले ती
पानोपानी बहरली

मात्र पौर्णिमेचा चंद्र
रात्र जाळीत चालला
विरहाचा तो निखारा
होता त्यानेच साहीला

होता वणवा अधीर
त्यात वाराही पेटला
पेटलेल्या वाऱ्‍याने त्या
सडा फुलांचा लोटला

ऊभा बकुळ एकाकी
त्याची एकली सावली
पेटलेल्या रानासवे
दाही दिशांना धावली

असे कण्हत जगणे
देऊनिया विझे चंद्र
दूर आळविते कुणी
मध्य सप्तकीचा मंद्र

संध्याराग

14 May 2012 at 14:38



अवतरला अवचित तिजवर
हा सांजरंग ओला
अन मेघही खुळ्यागत
जणू बावरुन गेला

ती आज दंग होती
पण रंग हा नवासा
रंगात गंधवेडा
प्राजक्त चिंब न्हाला

लेवूनी गंधित माला
ती होई सावळी राधा
तिचिया श्वासातून गहिरा
अंधार मावळून गेला

चमचमते चांदणेही
अदबीने दारी चमके
हे तोरण चमचमणारे
चंद्रही घेऊनी आला

ती अलगद छेडीत जाई
हा गंधित संध्याराग
अन सूर ओळखीचा
तिजला स्मरुन गेला

ती हाक ऐकू येई
कंपित सूर्यमाला
त्या कंपनात हळवा
स्वर तो विरुन गेला